संस्थापक अध्यक्ष मनोगत
श्री. विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे
(संस्थापक अध्यक्ष)
ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, श्रीगोंदा
“राम कृष्ण हरी”
जगद्गुरु संत तुकाराम कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व परमपूज्य स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या छत्रछायेखाली सन -2014 साली ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे छोटेसे रोपटे लावण्यात आले.
माऊलींच्या आशीर्वादाने व आपणा सर्वांच्या दृढ विश्वासामुळे या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
शेतकरी बांधवांना शेती विषयक संपूर्ण मार्गदर्शन व आर्थिक उन्नती करण्यासाठी अखंड कार्यरत राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
शेतकरी बंधूंची आर्थिक उन्नती करणेकामी ओम चैतन्य मल्टीस्टेटने सन 2016 साली चैतन्य ॲग्रो मॉल पारगाव फाटा येथे सुरू करून शेतकऱ्यांना कमीत-कमी खर्चात जास्तीत-जास्त गुणवत्तेची शेती उपयोग औषधे, खते, औजारे व बि-बियाणे उपलब्ध करून देणेसाठी सुरू केले तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालास योग्य बाजारभाव मिळावा म्हणून सन 2019 साली ओम चैतन्य मल्टीस्टेट ॲग्रो पर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि या नावाने सहकार पणन मंडळ पुणे यांचे कडून खाजगी बाजार समितीचा परवाना घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेती मालास योग्य हमीभाव, बाजारभाव व त्वरीत शेती मालाची पट्टी रक्कम देण्याची सोय करून शेतकरी राजा बळकट करून त्यांची आर्थिक उन्नती करण्याचा व देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हातभार लावणे हा आमचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे.
आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे आज ओम चैतन्य परिवार यशाची शिखरे चढत आहे, आज चैतन्य बाजार समितीमध्ये दिवसाला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे ती केवळ आपल्या संस्थेवरील प्रेमामुळे.
याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
“आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी सदैव तत्पर आहोत”.
आपला सेवक :- श्री. विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे (संस्थापक अध्यक्ष)