सभासद शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजन व शेती विषय गरजांचा विचार करून सन 2016 साली संस्थेमार्फत पारगाव फाटा (लोणी व्यंकनाथ ) येथे ओम चैतन्य ॲग्रो मॉल नावाने शेती उपयोगी साहित्य, रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके व बी-बियाणे इत्यादी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी मॉल सुरू करण्यात आला.
यामध्ये शेतकऱ्यांना उच्च गुणवत्तेचे शेती उपयोगी साहित्य कमीत कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाते. वेळोवेळी शेतकरी बांधवांना हंगामानुसार कोणती पिके घ्यावेत व त्यांचे कसे नियोजन करावे यासाठी शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन केले जाते, त्या पिकांचे काढणी पासून ते विक्री पर्यंतचे सर्व मार्गदर्शन ओम चैतन्य ॲग्रो मॉल मार्फत शेतकरी बांधवांना दिले जाते.
चैतन्य बाजार समिती खाजगी
सभासद शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे यांनी सन 2019 साली महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ पुणे यांचे कडून खाजगी बाजार समितीचे लायसन काढून पारगाव फाटा (लोणी ) तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती (खाजगी)स्थापन केली. त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उत्पादित केलेले कांदा कापुस सोयाबीन तूर हरभरा मुग उडीद भुईमूग मटकी ज्वारी बाजरी गहू अशा प्रकारचे धान्य व कडधान्य तसेच द्राक्ष दाळींब व फळे व भाजीपाला यांची बाजारपेठ उपलब्ध करून दिली. सदर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल आल्यानंतर त्वरित मालाचे वजन करून त्याची लिलावाद्वारे खरेदी विक्री केली जाते, त्यामुळे शेतकरी बांधवांना इतर बाजारपेठेच्या तुलनेत जास्त बाजार भाव मिळत असून सदर मालाची पट्टी रक्कम त्वरित देण्यात येते. सर्व व्यवहार संगणीकृत व अधुनिक तत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक केले जातात. शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी गोडाऊन आणि 60 टनी दोन वजनकाटे संस्थे मार्फत उपलब्ध करून दिलेले आहेत.